सुरकुत्या

सुरकुत्या तर कुणालाच चुकणार नाहीये मग सुरुकुत्या आलेल्या व्यक्ती ला अशी वागणूक का? ज्यांनी तुम्हाला जगात आणलं त्यांच्या च जगात एकांत का? हं!! आम्ही तत्ववादी, आम्ही आमचं जग स्वतः तयार केलं, अस म्हणारी पिढी हेच का तुमचे तत्व. दृष्टी खराब असली तर ऑपेरेशन करून ठीक करता येते, पण ज्यांचा दृष्टिकोनच खराब असेल त्यांच्यावर कुठलही औषध काम करत नाही. लहान असतांना आई वडील शिकवत असत अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका, पण त्यांना कल्पनाही नसेल कि आपल्या जवळ असणारेच विश्वासाच्या फ्रेम मध्ये बसत नाही. काय करायचं त्या थकलेल्या हात पायांनी निघून जायचं तुमच्या जगातून? 

 

विषय गंभीर होत चाललाये, लोक माणुसकी आणि संस्कार खरंच विसरत चाललेत का? उत्तर खरंच शोधण्याची गरज आहे. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात स्वास घेत असणाऱ्या पिढीला आपलेच प्रियजन परक्याची वागणूक देतांना दिसतायेत. “फक्त माझीच जबाबदारी आहे का? बाकी सर्वांना जन्म दिलाय ना, त्यांनी पण सांभाळावं ना..” असा प्रश्न तयार करून सरसकट जबाबदारीच ढकलतांना दिसतायेत. हि वय झालेली तीच पिढी आहे ज्यांनी आपल्या मुलांसाठी स्वतः अशिक्षित असतांना शिक्षणाचा आग्रह धरला, जेणे करून मूलं मोठी होतील आणि आपल्या म्हातारं पनाची काठी बनून सांभाळ करतील.

जग पुढे गेलं, सायन्स ने भरपूर प्रगती केली, इलेक्ट्रॉनिक्स युगात तर हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या लोकांना एका क्लिक वर बघता येईल, त्यांच्याशी बोलता येईल इतकं जवळ आणलं. पण घरातल्या त्या अशिक्षित, हतबल वृद्ध माणसांना शिकलेल्यांच्या मनातून आणि आपल्याच घरातून दूर केलं. दोन वेळेचं खायला आणि प्रेमाचे शब्द या पलीकडे त्यांना काय हवं असत हो. सुरकुत्या वाढतच जातात आणि त्यासोबतच त्यान्ना होणारा त्रास मनातल्या वेदना वाढतच जातात आणि त्या नाही ओळखल्या जात घरातल्याच माणसांकडून. हो, मात्र गावावरच्या जमिनीचा मात्र हिस्सा आपल्या नावे  त्यांनी करावा ह्याचा बंदोबस्त व्यवस्थित केला जातो.